कुंभार्ली घाटात कार दरीत कोसळली, हे नायब तहसीलदार झाले गंभीर जखमी

0
586
बातम्या शेअर करा

चिपळूण- कराड-चिपळूण मार्गावरील कुंभार्ली घाटात कार दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात अकलूजचे नायब तहसीलदार रविकिरण रामकृष्ण कदम हे गंभीर जखमी झाले. कदम यांनी प्रसंगावधान राखत गाडीतून उडी मारून स्वतःचा जीव वाचवला. आज, सोमवारी हा अपघात झाला.

अकलूजचे नायब तहसीलदार रविकिरण कदम हे कारमधून कराडहून चिपळूणकडे आपल्या नातेवाईकांकडे निघाले होते. अवघड वळणावर त्यांची कार दरीत कोसळली. रविकिरण कदम यांनी प्रसंगावधान राखत गाडीतून उडी मारून स्वतःचा जीव वाचवला. मात्र, अपघातात कदम गंभीर जखमी झाले. त्यांना अधिक उपचारासाठी तातडीने कराड येथे हलविण्यात आले आहे.
याबाबत माहिती मिळताच शिरगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी कदम यांना उपचारासाठी कराड येथे हलविण्यात आले आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here