शृंगारतळी – दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शृंगारतळी येथील गोल्डन पार्क मैदानावर गुहागर तालुका बेलदार समाज चषक 2025 चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा शनिवारी 5 एप्रिल पासून सुरू होणार आहेत.
गुहागर तालुका बेलदार समाज हा दरवर्षी विविध कार्यक्रमाचे आयोजन करत असतो. आपल्या समाजातील नवतरुण युवकांना विविध व्यासपीठ उपलब्ध करून देत असतो. यावर्षी सुद्धा महाराष्ट्र गुजरात गोवा या राज्यातील बेलदार समाजातील तरुणांना एकत्र करून बेलदार समाज चषक 2025 चा आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन गृहराज्यमंत्री योगेश कदम, गुहागरचे आमदार भास्कर जाधव, चिपळूणचे आमदार शेखर निकम, माजी आमदार विनय नातू, वाशिष्ट मिल्क अँड प्रॉडक्ट्सचे अध्यक्ष प्रशांत यादव तसेच प्रसिद्ध डॉक्टर राजेंद्र पवार यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. तरी सर्व क्रिकेट रसिकांनी आणि बेलदार समाजातील नागरिकांनी या स्पर्धेसाठी उपस्थित राहावे असे आवाहन नरेश पवार विनोद पवार संजय पवार बाळा जाधव सागर मोहिते आदींनी केले आहे.