खेड – खेड काऊन्सिल फाउंडेशन खेड यांच्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तसेच वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव यांना कृषिरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
खेडमधील मुकादम लँडमार्क येथे हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाला. यावेळी खेडचे माजी आमदार संजयराव कदम, सायली कदम, राष्ट्रवादीचे खेड तालुकाध्यक्ष विनायक निकम, सत्कारमूर्ती आरिफ बामणे (शौर्य पुरस्कार), डॉ. अनिता आवटी (आदर्श महिला पुरस्कार), डॉ. कमलाकर वडके (आरोग्य सेवा रत्न पुरस्कार), कु. उबेद शेकासन (युवा साहित्य रत्न पुरस्कार), खेड काऊन्सिल फाउंडेशनचे अध्यक्ष परवेज महाडिक, उपाध्यक्ष हनीफ घनसार, मुखतार कावलेकर, सचिव इम्तियाज कौचाली, चिकणे गुरुजी राष्ट्रवादीचे गुहागर विधानसभा क्षेत्राध्यक्ष योगेश शिर्के, राष्ट्रवादी युवकचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष फैसल पिलपिले आदी उपस्थित होते.