शृंगारतळी – MKCL आयोजित ऑलिंपियाड परीक्षा (MOM) मध्ये युनिटेक कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटरच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत रत्नागिरी जिल्ह्यातील पहिले तीन क्रमांक मिळवले आहेत.
इयत्ता नववीच्या इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज, पाटपन्हाळे येथील कुमारी केतकर अनुश्री प्रथम, कांबळे सम्यक द्वितीय क्रमांक तर शृंगारी उर्दू हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या शेख मुस्तफा यांनी तृतीय क्रमांक मिळवला.या परीक्षेत जिल्ह्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. युनिटेक कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटरच्या मार्गदर्शन आणि पाठिंब्यामुळे विद्यार्थ्यांना या प्रतिष्ठित परीक्षेत यश मिळवता आले.ही कामगिरी युनिटेक कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटरच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याच्या वचनबद्धतेचे आणि विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांमध्ये उत्कृष्टता गाठण्यासाठी प्रेरित करण्याचे प्रतीक आहे.यशस्वी विद्यार्थ्यांवर युनिटेक कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटरचे संचालक प्रा.जहूर बोट व सर्व शिक्षक तसेच त्यांच्या शाळेतील मुख्याध्यापक, सर्व शिक्षकांकडून शुभेच्छा आणि कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.