गुहागर ; या राजकीय नेत्यावर प्राणघातक हल्ला

0
1498
बातम्या शेअर करा

गुहागर – राज्यभरात विधानसभेचे वार जोरदार वाहत आहे. त्यातच प्रचाराचे काही दिवस राहिलेत अशातच गुहागर विधानसभा मतदारसंघात धक्कादायक असा प्रकार घडलाय 2019 च्या विधानसभेचे उमेदवार व वंचित बहुजन विकास आघाडीचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विकास तथा अण्णा जाधव यांच्यावर आज दुपारी गुहागर तालुक्यातील नरवण येथील सावली हाॅटेलबाहेर प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये अण्णा जाधव हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या या पार्श्वभूमीवर जिल्हाभरात कडेकोट बंदोबस्त असताना गुहागर येथे अण्णा जाधव यांच्यावर हा हल्ला झाल्याने सर्वत्र संताप आणि नाराजी व्यक्त केली जात आहे. या हल्ल्यामध्ये तिघे हल्लेखोर असावेत असा संशय आहे. चाकु हल्ला करून हे हल्लेखोर पसार झाले. चाकू हल्ला करणाऱ्या जवळ रिव्हाॅल्व्हर देखील होते. असे सांगितले जात आहे. सध्या गुहागर पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून हा हल्ला नेमक्या कोणत्या प्रकरणातून झाला.? हा हल्ला कोणी केला.? याबाबत मात्र सध्या गुहागर परिसरात एकच चर्चा रंगू लागली आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here