बातम्या शेअर करा

रत्नागिरी – महाराष्ट्रात परिवर्तन अटळ आहे. महाविकास आघाडीचे सरकार येणारच आहे. प्रशांत विजयी भव! अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे उमेदवार प्रशांत यादव यांना शुभेच्छा दिल्या.


रत्नागिरी येथे महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांची आज जाहीर सभा झाली. यानिमित्त हॉटेल कोहिनूर येथे चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांनी आपल्या सहकाऱ्यांसह उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. पुष्पगुच्छ आणि शाल देऊन प्रशांत यादव यांना उद्धव ठाकरे यांचे स्वागत केले आणि आशीर्वाद घेतले. त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी संगमेश्वरचे माजी आमदार सुभाष बने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार या पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बने, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संतोष थेराडे,, देवरुखचे शहराध्यक्ष निलेश भुवड, कोसुंबचे माजी सरपंच राजू जाधव, साडवलीचे माजी सरपंच बापू डोंगरे, युवकचे चिपळूण तालुका उपाध्यक्ष राहुल पवार आदी उपस्थित होते.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here