खेड ; खाडीपट्टा भागात बेसुमार वाळू उत्खनन शासनाचा लाखोंचा महसूल बुडीत

0
52
बातम्या शेअर करा

खेड – खेड तालुक्यातील खाडीपट्टा विभागातील बहिरवलीनजीक दाभोळ व वाशिष्ठी खाडीत वाळूची चोरी सुरू असून, लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. हे वाळू उत्खनन थांबले नाही तर ग्रामस्थ महसूल कार्यालयावर धडक मोर्चा काढतील, असा इशारा बहिरवली चौगुले मोहल्ला ग्रामपंचायत सदस्य शरीफ दाभोलकर यांनी दिला आहे.

खेड तालुक्यातील खाडीपट्टा विभागांमध्ये पावसाळ्यात देखील सहा सक्शन पंपाच्या माध्यमातून बहिरोलीत रात्रंदिवस विनापरवाना चोरटी वाळू उत्खनन केली जात आहे. बेकायदेशीर वाळू उत्खननामुळे शासनाचा महसूलही बुडत आहे.पावसाळ्यात वाळू उत्खनन बंद असताना खाडी भागात बहिरवली परिसरात सहा सक्शन पंपाच्या माध्यमातून रात्रंदिवस शेकडो ब्रास वाळू उत्खन केली जात आहे. त्या वाळूची वाहतूक करणारे क्षमतेपेक्षा जास्त वाळू भरून बेदरकार पणे वाहने चालवत खाडी पट्टा भागातील रस्त्यांची दुरवस्था करत असल्याने या अवैध वाळू उपशावर बंदी यावी अशी मागणी मच्छीमार संघटनेचे दिलीप जाधव, ग्रामपंचायत सदस्य शरीफ दाभोलकर, मेहराज चौगुले, जमालुद्दीन चौगुले यांनी केली आहे.बेकायदा वाळू उत्खननाकर त्वरित बंदी आणावी, अन्यथा धडक मोर्चा महसूल खात्याच्या कार्यालयावर काढण्यात येईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

अवैध वाळू खेड तालुक्यातील कर्जी गावच्या ठिकाणी सहा प्लॉटवर उतरली जात असून, त्या ठिकाणी साठा करण्यात येतो. तिथून खेड, दापोली व मंडणगड तालुक्यात बांधकामासाठी ही वाळू कोरेगाव, संगलट मार्गावरून रात्रंदिवस वाहतूक केली जात आहे. अशाच प्रकारची वाळू चिपळूण तालुक्यातील खाडी किनारी दोन-तीन गावात उतरवली जात असल्याने त्याकडेही महसूल विभागाने लक्ष द्यावे अशी मागणी केली जात आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here