गुहागर – आगामी काही दिवसात महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करू लागले आहेत. नुकताच एका मुलाखतीत आमदार भास्कर जाधव यांनी विनय नातू यांच्यावर जहरी टीका केली होती. त्याच टीकेला आज विनय नातू यांनी, जोरदार समाचार घेत स्वार्थासाठी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेतल्याची टीका भास्कर जाधव यांच्यावर केली.
डॉ. विनय नातू पुढे म्हणाले की, सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा- कमळ आणि शिवसेना- धनुष्यबाण वेगवेगळे लढले, त्यामुळे राष्ट्रवादीचे घड्याळ निवडून आले. सन २०१९ ला ते राष्ट्रवादीतून शिवसेनेत आले. शरद पवारांनी राष्ट्रवादीत पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदासह विविध पदे त्यांना दिली. पण केवळ स्वार्थासाठी त्यांनी सन २०१९ ला राष्ट्रवादीतून शिवसेनेत उडी मारून धनुष्यबाण हाती घेतले. म्हणजे केवळ आपल्या स्वार्थासाठी घड्याळ चिन्ह सोडून धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढविली आणि निवडून आले. हा मतदारसंघ केवळ आपल्या फायद्यासाठी वापरुन स्वतः चा विकास करुन घेतला. मतदार मात्र आजही उपेक्षितच आहे. अशी बोचरी टीकाही त्यांनी आमदार भास्कर जाधव यांच्यावर केली.