गुहागर ; दुचाकीची म्हशीला धडक , तरुणाचा मृत्यू तर एक जण जखमी

0
701
बातम्या शेअर करा

गुहागर – गुहागर तालुक्यातील कातळे येथील दोन तरुण दुचाकीवरून जात असताना काळोखात उभ्या असलेल्या म्हशीला बाईक ची धडक बसल्याने तरुण बाईक स्वाराचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्यामुळे सध्या या परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

खेड ; बनावट ट्रेडिंग ॲप्लिकेशनचा वापर करून फसवणूक करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या

गुहागर तालुक्यातील कातळे कुळेवाडी येथील सहा मित्र हे आपल्या तीन दुचाकीसह तवसाळ जेटी येथे रात्री जेवण झाल्यानंतर फेरफटका मारण्यासाठी घरातून निघाले होते यावेळी सर्वात पुढे निखिल कुळे हा दुचाकी घेऊन होता. त्याच्या गाडीचा वेग जास्त असल्याने रस्त्यामध्ये काळोखात उभी असलेली म्हैस त्याला दिसली नाही. त्याच्या दुचाकीची म्हशीलाच ठोकर बसली. त्यात तो दुचाकीवरून जागेवरच खाली पडला त्यामध्ये निखिल याच्या डोक्याला व छातीला जोरदार मार बसला तर त्याच्या मागे बसलेल्या मित्राला मुका मार लागला. या धडकेमध्ये दोघेही खाली पडले.हा अपघात पडवे तवसाळजेट्टी दरम्यान असलेल्या एका सपाट रस्त्यावर घडला. निखिलच्या सोबत असणाऱ्या मित्रांनी तात्काळ निखिल ला आणि त्याच्या मित्राला डेरवण येथील हॉस्पिटलमध्ये हलवले मात्र उपचारादरम्यान निखिलचा मृत्यू झाला तर साहिल वरती उपचार सुरू आहेत.

गुहागर तालुक्यातील काताळे येथील रहिवासी असलेला निखिल कामानिमित्त मुंबई येथे असतो मात्र तो गणपती सणासाठी आपल्या गावी आला होता. निखिल याच्या जाण्याने संपूर्ण गावावरती शोककळा पसरली आहे. या अपघाताबद्दल अधिक तपास सावर्डे पोलीस करत आहेत.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here