रत्नागिरी जिल्हा बँकेची चलाखी,फक्त १३ पूरग्रस्तांना अर्थसहाय्य..संदीप सावंतांकडून भांडाफोड

0
41
बातम्या शेअर करा

चिपळूण -२०२१ च्या महापूरानंतर रत्नागिरी जिल्हा बँकेकडून पूरग्रस्तांना फक्त ५ टक्के व्याजदराने कर्ज देण्याची मोठी घोषणा करण्यात आली होती.मात्र बँकेकडून फक्त १३ पूरग्रस्तांना कर्ज देण्यात आले आणि त्यामध्ये ५ जण त्यांचे नातेवाईक आहेत.म्हणजेच प्रत्यक्षात फक्त ८ जण पूरग्रस्त ठरले व त्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला. अश्या शब्दात संदीप सावंत यांनी भांडाफोड करत खळबळ उडवून दिली आहे.

रत्नागिरी जिल्हा बँकेत होत असलेल्या नोकर भरतीवरून अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष तसेच माजी तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनी जोरदार आक्षेप घेत बँकेत सुरू असलेल्या कारभाराची जणू लखतरे काढण्यास सुरुवात केली आहे.नोकर भरतीत १०० टक्के स्थानिकांना संधी मिळालीच पाहिजे ही त्यांची मूळ मागणी कायम असून भरती बाबत देखील त्यांनी काही गंभीर बाबी उघडकीस आणले आहेत.भरतीप्रक्रियेसाठी जी एजन्सी नियुक्त करण्यात आली ती शासन नियुक्त नसून आपल्या मर्जीतील एजन्सी नियुक्त करण्यात आली आहे.असा अत्यंत गंभीर आरोप देखील त्यांनी केला आहे.त्यामुळे भरतीप्रक्रिया पारदर्शक होणार नाही.असेही त्यांनी नमूद करत शासनाच्या निकषानुसारच भरती झाली पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
या बँकेत कसा कारभार सुरू आहे त्याची पोलखोल करण्यास संदीप सावंत यांनी सुरुवात केली असून मनमानी कारभाराची उदाहरणासह भांडाफोड केली आहे.२०२१ मध्ये चिपळूणमध्ये महापूर आला.त्यावेळी रत्नागिरी जिल्हा बँकेने पूरग्रस्तांना अर्थ सहाय्य करण्यासाठी एक योजना जाहीर केली होती.फक्त ५ टक्के व्याज दराने पूरग्रस्तांना अर्थ सहाय्य केले जाईल अशी रानाभीमदेवी घोषणा करून त्याचे जबरदस्त मार्केटींग करण्यात आले.परंतु ही योजना आपल्या लोकांसाठीच राबवण्यात आली असा थेट आरोप संदीप सावंत यांनी केला आहे. फक्त १३ लोकांना पूरग्रस्त ठरवून ५ टक्के दराने अर्थसहाय्य करण्यात आले.त्याची संपूर्ण यादी आपल्याकडे आहे.त्यामध्ये चलाखीने आपल्याच जवळच्या नातेवाईक व हितचिंतकांची ५ नावे घुसवून त्यांना कर्ज देण्यात आले.म्हणजेच जिल्ह्यात फक्त ८ लोकांना पूरग्रस्त म्हणून मदत करण्यात आली आहे.ही होती रत्नागिरी जिल्हा बँकेची पूरग्रस्त योजना,अश्या शब्दात संदीप सावंत यांनी भांडाफोड करून वेळ पडल्यास संपूर्ण यादीच आपण जाहीर करू असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.जी लोकं एखाद्या योजनेचा दुरूपयोग करू शकतात त्यांच्या कडून पारदर्शक नोकर भरतीची अपेक्षा तरी कशी करायची.?असा प्रश्न संदीप सावंत यांनी उपस्थित केला आहे


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here