चिपळूण – रत्नागिरी जिल्हा बँकेचे मंडळ हे “निरलाजे” मंडळ आहे….जनाची नाहीच…पण स्वतःच्या मनाची देखील लाज त्यांना राहिलेली नाही…..स्थानिक शेतकऱ्यांना,सुशिक्षित बेरोजगारांना कर्ज द्यायचे नाही…स्थानिक तरुणांना नोकरी द्यायची नाही.पण पश्चिम महाराष्ट्रातील उद्योजकांना कोट्यवधीच्या कर्जाची जणू खैरात या लोकांनी केली आहे.तब्बल ५६५ कोटी रुपये पश्चिम महाराष्ट्रात वाटले…? लाज कशी वाटत नाही….असा संताप व्यक्त करत संदीप सावंत यांनी आता रत्नागिरी जिल्हा बँकेचे नाव चक्क कोल्हापूर जिल्हा बँक करा,…. अश्या जळजळीत शब्दात जणू कानच टोचले आहेत.
बँक कोणाची..? अखिल भारतीय मराठा महासंघाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष संदीप सावंत यांनी थेट रत्नागिरी मध्यवर्ती सहकारी बँक विरोधात थेट एल्गार पुकारला आहे.घोटाळ्यांची एक-एक प्रकरणे ते आता बाहेर काढू लागले आहेत.नोकर भरती,पूरग्रस्त कर्ज योजना अशी प्रकरणे उघडकीस आणल्यानंतर त्यांनी कर्ज वाटपात झालेला महाघोटाळा बाहेर काढला आहे.रत्नागिरी जिल्हा बँक ही रत्नागिरीतील कष्टकरी शेतकरी,सर्वसामान्य लोकांची की पश्चिम महाराष्ट्रातील धनदांडगे फसवे उद्योजकांची असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
हा घ्या पुरावा,आता बोला…
संदीप सावंत या विषयात कमालीचे आक्रमक झाले आहेत.ते म्हणाले हे निरलाजे मंडळ आहे.जिल्ह्यातील लोकांना फसवून बँक आपल्या मनमर्जीप्रमाणे चालवत आहेत. रत्नागिरी जिल्हा सहकारी बॅंकेमार्फत सहभाग योजनेअंतर्गत सण जानेवारी २०१५ ते ऑगस्ट २०२०-२१ या कालावधीत खालील साखर कारखान्याला कर्ज पुरवठा करण्यात आलेला आहे. त्यांची नावे खालील प्रमाणे .डॉ.डी.वाय पाटील साखर कारखाना ज्ञानशांती नगर तालुका.गगनबावडा कोल्हापूर
श्री.दूध गंगा-भेद गंगा सहकारी साखर कारखाना बिद्री तालुका.कागल कोल्हापूर ,श्री.छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना करवीर कोल्हापूर,सरकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखाना, चंद्रभागा नगर तालुका.पंढरपूर जिल्हा.सोलापुर यांना कोट्यावधीचे कर्ज रत्नागिरी जिल्हा बँकेने दिले आहे….काय संबंध आहे,कोणाचे हे कारखाने ?आणि रत्नागिरी जिल्ह्याची बँक असताना पर जिल्ह्यात इतके कर्ज का दिले..?हा घोटाळा नव्हे का.? असा प्रश्न उपस्थित करत लाज वाटत असेल तर रत्नागिरी जिल्हा बँकेचे नाव थेट कोल्हापूर जिल्हा बँक करा…..असेही त्यांनी सुनावले आहे.
तर रस्त्यावर उतरेन…… नाव आणि कर्जाची रक्कमसह आपल्याकडे यादी आहे.जर थोडीशी तरी लाज असेल तर या संदर्भात खुलासा करून हे कर्ज का.?आणि कोणाच्या आदेशाने दिले हे जाहीर करावे….. अन्यथा आम्हाला ते जगजाहीर करावे लागेल,तुम्हाला स्थानिक तरुण नको,कष्टकरी शेतकरी नको….पण पश्चिम महाराष्ट्रातील फसवे धनदांडगे चालतात का.?माझ्या प्रश्नांची उत्तरे द्या…..अन्यथा सोडणार नाही…..बँके समोर आणि चक्क रस्त्यावर बसून आंदोलन उभे करीन,रस्त्या-रस्त्यावर बॅनर लावून तुमचा मनमानी कारभार व घोटाळे जनतेसमोर आणल्याशिवाय गप्प बसणार नाही.असा अत्यंत गर्भित इशारा संदीप सावंत यांनी दिला आहे.