मुंबई – माई संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष शितल करदेकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष दालनात भेट घेतली यावेळी शीतलताईंची असलेली प्रमुख मागणी म्हणजे “पत्रकारांसाठी महामंडळ” बनाव याबाबत चर्चा केली तसेच येत्या आठवड्याभरात यावर चर्चा करून मार्ग काढू असे लेखी सांगितले . व आता आपले आमरण उपोषण मागे घ्यावे ही विनंती केली मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला मान देऊन शीतलताईंनी आंदोलन मागे घेतले त्यांना,आ.प्रसाद लाड व आ.नितेश राणे यांनी इलेक्ट्रॉल पाणी पाजले.
पत्रकारांच्या हक्कासाठी शितल करदेकर यांचं दहा पासून आमरण उपोषण… सरकारच्या भूमिकेकडे लक्ष..
माध्यमकर्मी कल्याणकारी मंडळासाठी ( वेल्फेअर बोर्ड ) माईच्या अध्यक्ष शीतलताई करदेकर , बुधवारपासून आझाद मैदान येथे आमरण उपोषणाला बसल्या होत्या. विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी आमरण उपोषणाच्या पहिल्याच दिवशी दूरध्वनी वरून संपर्क साधून ” ताई तुमच्या मागण्या रास्त असून आम्ही यावर योग्य ते करू. परंतु तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्यावी” तसेच त्यांनी चर्चा करण्याचे आश्वासनही दिले,
विधान सभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून शीतलताईंच्या तब्येतीची विचारपूस करुन काळजी घेण्याची विनंती केली तसेच माध्यमकर्मींसाठी महामंडळ व्हावे ही आमचीही इच्छा आहे आणि यासंदर्भात संदर्भात चर्चा करु असे आश्वासन दिले.
त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी आजाद मैदान येथे शीतलताई करदेकर यांची भेट घेऊन तब्येतीचे विचारपूस केली तसेच “पत्रकारांसाठी स्वतंत्र महामंडळ असायला हवे ही रास्त मागणी असून त्यांनी माध्यमकर्मींसाठी उभारलेल्या लढ्याला आमच्या पक्षाचा पाठिंबा आहे’ असे जाहीर केले.
या आमरण उपोषणास माईचे संस्थापक सरचिटणीस डॉ.सुभाष सामंत,मुंबई संघटन सचिव सचिन चिटणीस,सहकोषाध्यक्ष चेतन काशीकर,संस्थापक सदस्य शेखर धोंगडे,डाॅ अब्दुल कदीर, लक्ष्मीकांत घोणसे पाटील, सुनील कटेकर,प्रवीण वाघमारे,गणेश तळेकर,अनिल चासकर,पराग सारंग,भुपेश कुंभार,भूषण मांजरेकर,विवेक कांबळे, चंद्रशेखर पाटील,दीपक चिंदरकर,सुभाष डुबळे यांच्यासह अनेक सदस्य, पदाधिकारी उपस्थित होते.