खेड – मुंबई गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमधील सुप्रिया लाईफसायन्स लि. कंपनीला सर्वोत्कृष्ट कंपनी म्हणून पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कंपनीला ‘अक्टिव्ह फार्मास्युटिकल इंग्रेडिएंटस्’ हा सन्मान देऊन गौरविण्यात आले.
२३ रोजी मुंबई येथील कोहिनूर कॉन्टीनेन्टल हॉटेलमध्ये हा कार्यक्रम झाला. सन २०२४ मध्ये फार्मास्युटिकल क्षेत्रात या कंपनीने केलेल्या कार्याची दखल घेऊन कंपनीचा गौरव करण्यात आला आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सतीश वाघ यांना हा पुरस्कार देण्यात आला. ‘अॅडव्हान्टेज इंडिया केमिकल कॉन्क्लेव्ह अवॉर्ड’ने त्यांचा सतीश वाघ गौरव करण्यात आला. या शिवाय देशभरातील अन्य उद्योजकांनाही गौरविण्यात आले. त्यामध्ये बेस्ट कंपनी म्हणून सुप्रिया लाईफसायन्सचा गौरव करण्यात आला. याबाद्दल वाघ यांचे लोटे असोसिएशन आणि उद्योजकांकडून अभिनंदन होत आहे.