गुहागर ; ऐकावं ते नवलच गेल्या चार तासापासून ही बस या कारणासाठी एकाच जागेवर उभी…

0
930
बातम्या शेअर करा

गुहागर – तुम्ही एसटीने प्रवास करून मुंबईतून गावी आलात मात्र त्याचवेळी एसटीच्या डिक्की मध्ये असलेल् तुमचे सामान जर तुम्हाला चार तास काढता आलं नाही तर काय होईल….. असाच काहीसा प्रकार झालाय मुंबई- तवसाळ या बस मध्ये सकाळी आठ वाजल्यापासून आत्ता अकरा वाजेपर्यंत प्रवासी एसटीची डिक्की
उघडण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण मुंबईतून आलेल्या प्रवाशांचे त्या डिक्की मध्ये सामान आहे. आणि एसटीचा डिक्की उघडत नाहीये असा हा अंदागोंदी कारभार सध्या एसटी महामंडळाचा आणि गुहागर आगाराचा समोर येतोय त्यामुळे प्रवाशांमधून आणि स्थानिकांमधून संताप आणि नाराज व्यक्त करण्यात येत आहे.

गुहागर आगाराची मुंबई – तवसाळ गाडी क्रमांक MH14 BT 2729 ही बस आज सकाळी आबलोली येथे आली त्यावेळी मुंबईतून आलेले काही प्रवासी उतरले त्यांच्यासोबत आणलेले त्यांचे सामान हे एसटी बसच्या डीक्की मध्ये ठेवले होते. ते काढण्यासाठी त्यांनी बसची डिक्की उघडण्याचा प्रयत्न केला मात्र ही डिक्की काही उघडे ना… त्याचवेळी अनेक प्रयत्न करूनही या बसची ही डिक्की उघडत नसल्याने गुहागर आगारातील आगार प्रमुख यांच्या कानावर ही गोष्ट सांगण्यात आली. त्यावेळी मात्र गुहागर आगारातून अजब उत्तर ऐकायला आले ती बस तशीच गुहागर मध्ये आणून डेपो मध्ये जमा करा आम्ही या ठिकाणी त्या बसची डीक्की उघडून देतो असा अजब उत्तर सांगण्यात आलं… जे प्रवासी मुंबई मधून गावी आलेत त्यांचा सामान त्या डिक्की आहे. आणि गुहागर आगाराचे अधिकारी असे अजब उत्तर देत आहेत .त्यामुळे गुहागर आगाराच्या या अजब कारभाराची चर्चा सध्या गुहागर सह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात सुरू आहे…. या बसची डीक्की उघडण्यात अजून एसटी महामंडळाला किती वेळ लागणार आहे हे येणारा काळच सांगेल… या संपूर्ण प्रकाराबद्दल गुहागर येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे तालुकाप्रमुख सचिन बाईत यांनी नाराज व्यक्त केली असून प्रवाशांच्या होणाऱ्या गैरसोरीला जबाबदार कोण.? असा प्रश्न त्यांनी प्रशासनाला केला आहे. सचिन बाईत त्यांनी सदर प्रवाशांची चौकशी केली असून एसटीच्या अधिकाऱ्यांना जागेवर येऊन त्या बसची डीक्की उघडून देण्याचं त्यांनी सांगितले आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here