गुहागर – राज्यात कोरोनाचा प्रभाव वाढत आहे अशातच आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार कोविडची अत्यंत कमी व पूर्वलक्षणे आढळून आलेल्या रुग्णांना गृह विलगीकरणात (होम आयसोलेशन) ठेवले जात आहे.
होम आयसोलेशनसाठी मार्गदर्शक सूचना
– स्वतंत्र शौचालय
– घरातील जेवणाची भांडी वेगळी
– दररोज वापरणारे कपडे गरम पाण्यात निर्जंतुकीकरण करणे
– काळजीवाहू व्यक्तीने ट्रिपल लेअर मास्क वापरणे
– सतत मास्क घालणे व आठ तासानंतर बदलणे
– ओला किंवा खराब मास्क वापरू नये
– मास्क निर्जंतुक करुन डिस्पोज करणे
– रक्तदाब, हद्यरोगग्रस्त ज्येष्ठांसोबत संपर्क होता कामा नये
– पुरेसा आराम व योग्य आहार गरजेचा
– ऑक्सिजन पातळी व शरीराचे तापमान दररोज मोजणे
– खोलीत इतरांना प्रवेश निषिद्ध
– केवळ मोबाईलवरच सर्वांशी संपर्क
– हात लावलेली प्रत्येक वस्तू हायपोक्लाराईट सोल्यूशनने स्वच्छ करणे
– वारंवार हात व शरीर गरम पाण्याने व साबणाने स्वच्छ धुणे
– गरम पाणीच गरजेचे
– दिलेली औषधे व डॉक्टरांचा सल्ला बंधनकारक
– काळजीवाहू व्यक्तीने हॅंडग्लोव्हज घालणे अत्यावश्यक
– धूम्रपान करू नये
होम आयसोलेट केलेल्या रुग्णांनी नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे. अन्यथा त्यांना दवाखान्यात दाखल करावे लागेल. लक्षणे तीव्र असल्यास त्यांनी योग्य ती दक्षता घ्यावी. त्यांच्या निष्काळजीपणामुळे इतरांना संसर्ग होता कामा नये. बिनधास्तपणे बाहेर जाणे घातक आहे.