रत्नागिरी ; आता या …कार्यालयात कोरोनाचा शिरकाव

0
942
बातम्या शेअर करा

रत्नागिरी – रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक शासकीय कार्यालयातही आता कोरोनाचा शिरकाव होऊ लागला आहे. आता जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रमुख विभागात काम करणार्‍या एका कर्मचाऱ्याचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला असून हा संपूर्ण विभाग क्वॉरंन्टाईन करण्यात आला आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून मंगळवारी आलेल्या अहवालांमध्ये रत्नागिरी  जिल्हाधिकारी  कार्यालयातील एका कर्मचाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या कार्यालयातील एक प्रमुख विभागातील हा कर्मचारी असून, त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर संपूर्ण विभाग क्वारंटाईन करण्यात आला आहे. या अहवालानंतर आता जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here