बातम्या शेअर करा

रत्नागिरी- गेल्या 24 तासात प्राप्त अहवालांमध्ये 47 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव रुग्णांची संख्या 1309 झाली आहे. दरम्यान 19 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 768 झाली आहे. आज बरे झालेल्यांमध्ये जिल्हा कोव्हीड रुग्णालय 1, संगमेश्वर 2, कोव्हीड केअर सेंटर, केकेव्ही, दापोली 15 आणि 1 कामथे, चिपळूण मधील आहेत.


पॉझिटिव्ह रुग्णांचे विवरण खालील प्रमाणे
जिल्हा कोव्हीड रुग्णालय, रत्नागिरी – २१ रुग्ण
उपजिल्हा रुग्णालय, कामथे -24 रुग्ण
कळबणी – 1 रुग्ण
ॲन्टीजेन – 1 रुग्ण
साखरीनाटे, राजापूर येथील एका 65 वर्षीय कोरोना रुग्णाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या आता 42 झाली आहे.


तालुकानिहाय मृतांचा आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे .
रत्नागिरी – 8
खेड – 4
गुहागर – 2
दापोली – 10
चिपळूण – 8
संगमेश्वर – 6
लांजा – 1
राजापूर – 2
मंडणगड – 1
सायंकाळची स्थिती खालीलप्रमाणे
एकूण पॉझिटिव्ह – 1309
बरे झालेले – 768
मृत्यू – 42
एकूण ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह – 499

ॲक्टीव्ह कन्टेंनमेन्ट झोन
जिल्ह्यात सध्या 105 ॲक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यात 23 गावांमध्ये, दापोली मध्ये 7 गावांमध्ये, खेड मध्ये 24 गावांमध्ये, लांजा तालुक्यात 6, चिपळूण तालुक्यात 33 गावांमध्ये, मंडणगड तालुक्यात 3 , गुहागर तालुक्यात 6 आणि राजापूर तालुक्यात 3 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here