गुहागर – प्रत्येकाच्या आयुष्यात आपला जन्मदिवस म्हणजेच वाढदिवस आगळावेगळा साजरा करण्यावर भर असतो. काहीजण मित्रांना पार्टी देऊन साजरा करतात तर काहीजण आपल्या कुटुंबासह कुठेतरी फिरायला जाऊन तो वाढदिवस साजरा करतात. मात्र गुहागर तालुक्यातील वडद आरोग्य उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी. डॉ. दत्ता मुळे यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून वडद आणि तळवली या गावांमध्ये एकुण पाच जिल्हा परिषद मराठी शाळेमध्ये १५० शालेय बॅगांचे वाटप करत आपला आगळावेगळा असा वाढदिवस साजरा केला त्यांच्या या उपक्रमासाठी त्यांना त्यांचे सहकारी आरोग्य उपकेंद्र गिमवीचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.अनिकेत मैंद यांनी सहकार्य करत गिमवी या गावातील प्राथमिक शाळांमध्ये पहिली ते चौथीपर्यंत सर्व मुलांना स्कूल बॅगचे वाटप केले.
सध्याचा इंग्रजी मीडियम स्कूल कडे वाढता कल आणि मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे. त्यासाठी प्रोत्साहन मिळावे व आपला वाढदिवस आपल्या कायमस्वरूपी लक्षात राहावा यासाठी हा उपक्रम आपण राबवला असे त्यांनी सांगितले. ज्या गावांमध्ये आपण आपली सेवा बजावते त्या गावासाठी आपण हा उपक्रम राबविण्याचा आपल्याला सार्थ अभिमान असल्याचा सुद्धा त्यांनी सांगितलं त्यांच्या या उपक्रमाचे या सर्व गावांमधून कौतुक केले जात आहे.