राजापुर – राजापूर तालुक्यातील खारेपाटण ,गुरववाडी येथील नितीन सुभाष चव्हाण या तरुणाचा छातीत बंदुकीची गोळी लागुन मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली या प्रकरणी खारेपाटण कणकवलीचे पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मयत नितीन चव्हाण हा मंगळवारी रात्री राजापूर तालुक्यातील पन्हळे ,शेजवली परीसरात शिकारीसाठी आला होता त्यावेळी त्याने आपली बंदुक छातीजवळील भागाकडे तोंड करुन ठेवली होती. त्यानंतर नक्की काय प्रकार घडले ते समजले नाही. मात्र नितीन चव्हाण यांच्या छातीतुन गोळी घुसुन ते जखमी झाले होते . जखमी अवस्थेत त्यांनी आपल्या भावाला मोबाईलवर कॉल करुन माहिती दिली अशी माहिती समोर आली आहे.
त्यानंतर नितीनचे नातेवाईक त्या जंगलात पोचले शोधाशोध केल्यानंतर जखमी अवस्थेतील नितीन त्याना सापडला पुढील उपचारासाठी त्याला कणकवली येथे नेत असताना वाटेतच त्याची प्राणज्योत मावळली या प्रकरणी खारेपाटण व कणकवली पोलीस तपास करीत आहेत.