चिपळूण ; बोरगांव, चिवेली आणि कौंढर येथील अनधिकृत खाण व्यवसाय मालकांच्या सातबारा वर शासकीय बोजा…….

0
331
बातम्या शेअर करा

चिपळूण – चिपळूण तालुक्यातील काही भागात गेल्या अनेक वर्षापासून अनधिकृत दगड खाणी आणि शासनाचा बुडीत महसूल याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते विद्याधर दत्ताराम साळुंखे हे संबधित खाण मालक आणि दोषी अधिकारी यांच्यावर कारवाईसाठी पाठपुरावा करीत आहेत.त्यांचा पाठपुरावा आणि माहिती अधिकारात मिळालेले कागदपत्रे यांची शेवटी शासनाला दखल घेण्यास भाग पाडून शासनाने सुद्धा तहसील कार्यालय यांना सर्व खाणीची एटीएस मशीन द्वारे मोजणी करून अहवाल सादर करण्यास सांगितले होते.त्यानुसार तहसीलदार कार्यालय यांनी मोजणी करून २९ खाण मालकांना नोटीस बजावल्या आहेत.त्यामध्ये सुरवातीलाच फक्त पांच खाण मालकांना रुपये ३ लक्ष वर दंड ठोठावला होता.त्यामधील एक खाण मालक न्यायालय मध्ये गेल्या मुळे त्यांचे प्रकरण न्यायालय मध्ये प्रलंबित आहे.

माञ बाकी चार खाणमालक यांनी अजूनही दंड न भरल्यामुळे त्यांच्या जमिनीवर शासकीय बोजा आकरण्यासाठी सजा तलाठी यांना तहसीलदार विभागाने पत्र दिले होते.
त्या पत्राच्या अनुषंगाने तलाठी यांनी विक्रम विश्वनाथ साळुंखे ,मिळकत जमीन १५ ,दंड रुपये ४०९१७८९ /- सीताराम बाजी साळुंखे,मिळकत जमीन १५, दंड रुपये २४५०००४ /- संजय बाबू हुमने, मिळकत जमीन ११ , दंड रुपये ६३०४३५ /- सतीश रघुनाथ इंदुलकर , मिळकत जमीन १४ , दंड रुपये ३५०२८२६ /- या खाणी मालकांच्या सर्व मिळकत जमीन वर सातबारावर शासकीय बोजा चढवून त्याची प्रत तहसीलदार विभागाला प्रस्तुत केली आहे.
लवकरच बाकी खाण मालकांवर सुद्धा कारवाई प्रस्तावित करण्यात येईल.असे चिपळूण तहसीलदार विभागाने तक्रारदार विद्याधर साळुंखे यांना आश्वासन दिले आहे.

त्यामुळे चिपळूण तालुक्यासह गुहागर तालुक्यात बेकायदेशीर खाणीत चालवणाऱ्या अनेकांचे धाबे दणाणले आहेत.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here