मराठा प्रीमियम लीग गुहागर…….

0
562
बातम्या शेअर करा

गुहागर – गुहागर तालुक्यातील मराठा समाजातील युवकांसाठी शुंगारतळी येथे मराठा प्रीमियम लीग गुहागर या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा ही ग्रामीण भागातील मराठा समाज्यातील खेळाडूंनसाठी सुवर्णसंधी ठरले. या स्पर्धेसाठी तालुक्यातील खेडोपाड्यातील खेळाडू मोठ्या उत्साहाने सहभागी होणार आहेत.

गुहागर तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी क्रिकेट हा खेळ खूप लोकप्रिय आहे. गावागावात, वाडी-वाड्यात जवळपास ऑक्टोबर पासून संपूर्ण मे महिन्यापर्यंत अनेक प्रकारच्या क्रिकेट स्पर्धा भरवल्या जातात. त्यासाठी गावातले स्थानिक तरुण, मुंबईचे तरुण असे एकत्र येऊन गावातील तरुणांमध्ये एकोपा निर्माण व्हावा खेळाची जिद्द निर्माण व्हावी आणि त्याच खेळाच्या बळावर त्यांनी भविष्यात आपला खेळ दाखवा या उत्साहाने अनेक ठिकाणी स्पर्धा भरवल्या जातात. मात्र या सर्व प्रकारात गुहागर तालुक्यातील मराठा समाज्यातील नवतरुण खेळाडू एकत्र यावेत आणि या मधून एखादा खेळाडु हा जिल्हा पातळीवर किंवा राज्य पातळीवर खेळता यावा यासाठी गुहागर तालुक्यातील संपूर्ण मराठा बांधवांनी एकत्र येत या वर्षीपासून मराठा प्रीमियमलीग स्पर्धा भरवण्याचा निर्णय घेतला.
या स्पर्धेसाठी गुहागर तालुक्यातील गावातील व मुंबई स्थित असणारा संपूर्ण मराठा समाज एकटवला असून या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नियोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा मार्च महिन्याच्या 24 तारखेपासून सुरू होणार असून या स्पर्धेसाठी तब्बल 320 खेळाडूंची नोंदणी करण्यात आली आहे तर 20 संघ या स्पर्धेत खेळवण्यात येणार आहेत.

या स्पर्धेत प्रत्येकी चार संघाचा एक गट तयार करण्यात आला असून त्यांच्यामध्ये लीग पद्धतीने मॅचेस खेळवल्या जाणार आहेत. तर या 20 संघातून आठ सुपरआठ संघ काढले जाऊन पुढील सामने खेळवले जाणार आहेत.

या स्पर्धेसाठी तालुक्यातून अनेक नामवंत खेळाडू आणि ग्रामीण भागातील खेळाडू येणार असल्याने या स्पर्धेमध्ये कोण विजयी होणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. या स्पर्धेसाठी तालुक्यातील मराठा समाजातील नामवंत तरुणांनी व बांधवांनी एकत्र येत या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नियोजनही चांगल्या प्रकारे केल आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून जमवला जाणारा निधी हा देवघर येथे होणाऱ्या मराठा भवन साठी वापरला जाणार आहे.

मराठा प्रीमियमलीग ही नुसती स्पर्धा नसून या स्पर्धेतून जे खेळाडू तालुकास्तरावर आपलं नेतृत्व आपली क्षमता सिद्ध करतील या खेळाडूंना भविष्यात जिल्हास्तरावर आणि
राज्यस्तरावर कसा खेळता येईल यासाठी सुद्धा आयोजक संधी
उपलब्ध करून देणार आहेत. त्यामुळे खरोखरच मराठा प्रीमियमलीग ही ग्रामीण भागातील तरुणांसाठी एक सुवर्ण संधी ठरणार आहे. हे मात्र तेवढेच खरे…


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here