रायगड – मुंबई-गोवा हायवेवर कोकणातील प्रवाश्यांचा गाडीवर रात्री 2.30 च्या सुमारास हल्ला व दरोडा पडला. चार-पाच जणांना रॉड, स्टंपने मारहाण केली. तसेच 15 तोळे सोने लुटून आरोपींनी पोबारा केल्याची घटना घडली. रात्री 3 च्या सुमारास मुंबई-गोवा हायवेवर पेणजवळ हॉटेल मीलन पॅलेससमोर हा प्रकार घडला. भीतीच्या आकांताने दापोलीतील कुटुंबीयांनी कसे-बसे पनवेल एसटी बस स्थानक गाठून आसरा घेतला.
पनवेलमधून पोलीस कंट्रोल रूम 100 नंबरवर मदत मागितली. त्यानंतर पोलिसांची मदत पोहचली. त्यानंतर नवी मंबई पोलिसांनी कुठलाही बंदोबस्त केला नाही. तक्रारदारांना असुरक्षित वाटत असताना स्वतः पेण ला पाठवले. घाबरत घाबरत तक्रारदार पेण मधील हमरापूर फाट्यापर्यंत पोहचले. सर्व आरोपी 3 कारमध्ये होते. स्विफ्ट, वेंटो, एर्टिगा मध्ये 15 पेक्षा जास्त आरोपी होते.
यापैकी राजस्थान पासिंग स्विफ्ट कार घटना स्थळावरून पोलिसांनी ताब्यात घेतली. तर अन्य दोन कारने आरोपी नवी मुंबई दिशेला पळून जाण्यात यशस्वी झाले. पुढील कारवाई दादर सागरी पोलीस स्टेशन करीत आहे. प्रशांत मोहिते म्हणाले, दापोलीपासून प्रवास करत होतो. पेण ला असलेल्या साई सहारा हॉटेलजवळ आल्टिका गाडीत असलेल्या मुलांनी गाडीवर दगडफेक केली. दोनशे मीटरवर गाडी थांबवून दगड का मारले म्हणून विचारना केली. तेवढ्यात तिथं आणखी दोन कार आल्या.
तिथून तीस-बत्तीस मुलं बाहेर आली. त्यांनी आमच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यात माझा भाऊ आणि मी जखमी झालो. माझ्या बहिणीलासुद्धा त्यांनी मारहाण केली. आमच्या गड्यातील सोनं खेचून ते पळून गेले. घटनास्थळी एक गाडी राहिली होती ती गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली.
पोलीस घटनास्थळी आले. तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात बोलावलं. आमच्या कुटुंबीयांकडून १५ तोळ्यांच्या सोन्याची लूट केली आहे. शिवाय आम्हाला मारहाण करण्यात आली आहे. तीन गाड्या होत्या. त्यापैकी स्वीफ्टचा नंबर राजस्थान पासिंगचा दिसला. दुसरी लाल रंगाची स्कोडा गाडी होती.