मुंबई – महापारेषणच्या मुख्य महाव्यवस्थापक (माहिती तंत्रज्ञान) या पदाचा कारभार नागसेन वानखेडे यांनी
स्वीकारला आहे.
नागसेन वानखेडे हे यापूर्वी ते IBM, L&T इन्फोटेक, EESL JV ऊर्जा मंत्रालय, TCS तसेच त्यांनी यूके, जर्मनी, यूएस, कॅनडा आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये 5 वर्षांपेक्षा जास्त विविध पदावर काम केलेले आहे.
त्यांचा IT व्यवस्थापन, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट्स, कन्सल्टिंग, SAP एंटरप्राइझ आर्किटेक्ट, एकात्मता डिझाइन आणि अंमलबजावणी, आयटी ऑपरेशन्ससाठी ऑटोमेशन, सायबरसुरक्षा, क्लाउड सोल्यूशन्स आणि व्यवसाय वाढवणारे डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन प्रदान करण्यात तज्ज्ञ, असा एकूण 18 वर्षांचा त्यांना अनुभव आहे.
त्यांनी औरंगाबादच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून उत्तीर्ण झाले आहे, त्यानी कृत्रिम बुद्धिमत्ता अभियांत्रिकी आणि डेटा सायन्समध्ये ड्युअल मास्टर्स पूर्ण केले आहेत. त्यानी एसएपी, डिझाइन थिंकिंग, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन्स, नेटवर्क्स, सिक्युरिटी आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट इत्यादी विविध व्यावसायिक प्रमाणपत्रे प्राप्त केली आहेत.
एकूणच त्यांच्या या कामाचा अनुभव व शिक्षणानुसार त्यांना विविध पुरस्कार प्राप्त झाले आहे. त्याचबरोबर नागपूर येथील व्हीएनआयटी संशोधन मध्ये सहयोगी म्हणून काम केले आहे.
युकेमधील क्लायमेट सायन्स येथे त्यांचे मोठे योगदान राहिले आहे.