इको कार आणि ट्रकचा अपघात नऊ प्रवाशांचा जागीच मृत्यू

0
930
बातम्या शेअर करा

माणगाव – मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला असून अपघातात 9 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान, अपघाताचे घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.आहे. गुहागर तालुक्यातील हेदवी येथे एका कार्यक्रमासाठी येत असताना या इको कारचा हा अपघात झाला.

प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, इको कार आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. गोरेगाव हद्दीतील रेपोलीनजीक पहाटेच्या पाचच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातात गाडीचा चक्काचूर झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, ९ जण जागीच ठार झाले आहेत. यामध्ये ४ महिला आणि ५ पुरुषांचा समावेश आहेत. तर, या अपघातात ४ वर्षाचे एक लहान मुल बचावले आहे. त्याच्यावर माणगाव येथीस सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहे.

दरम्यान, अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर आता पोलिसांनी मार्गावरील अपघातग्रस्त वाहने बाजूला करुन वाहतूक पूर्ववत केली आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here