बातम्या शेअर करा

गुहागर – गुहागर वरचापाट येथील समुद्रकिनारी वाळुमध्ये १५ नोव्हेंबर रोजी ऑलिव्ह रिडले या प्रजातीच्या समुद्री कासव मादीने पहीले घरटे तयार करण्यात आले होते. सदर घरटयामध्ये ऑलिव्ह रिडले मादींच्या कासवांची १२३ अंडी सुरक्षित करण्यात आली होती. सदर सुरक्षीत केलेल्या अंडयामधून कासवाची सहा पिल्ले (ऑलिव्ह रिडले) सुरक्षितपणे समुद्रामध्ये सोडण्यात आली. १२ जानेवारी रोजी वेळास समुद्री किनाऱ्यावर सुरक्षित केलेल्या १२० अंडयामधून २६ पिल्ले समुद्रामध्ये सोडण्यात आली होती.

१३ नोव्हेंबर रोजी गुहागर वरचापाट या ठिकाणी ऑलिव्ह रिडले समुद्री कासव मादीने १२३ अंडी घातलेली आहेत. त्यामधून ६ कासवांची पिल्ले आज बाहेर पडली आहेत. यंदाच्या कासव विणीच्या हंगामास अंडयांचे संवर्धन करणाऱ्या कासवमित्रांची मार्गदर्शनपर कार्यशाळा दापोली व गुहागर येथे पार पडली. यावर्षीपासून कासवमित्र हे घरटयांच्या नोंदी एम टर्टल अॅपमध्ये नोंदवतील. यासंदर्भातील कासवमित्रांना तज्ञांकडून प्रशिक्षण देण्यात आले असुन, यामुळे कासवांच्या घरटयांची आणि त्यातुन बाहेर पडणाऱ्या पिल्लांच्या संख्येची अचुक नोंद होणार आहे.

सदरच्या कासव संवर्धन मोहीमेमध्ये विभागीय वन अधिकारी रत्नागिरी (चिपळूण) दिपक खाडे, सहाय्यक वनसंरक्षक रत्नागिरी (चिपळूण) सचिन निलख यांचे मार्गदर्शनाखाली श्रीमती राजश्री कीर परिक्षेत्र वन अधिकारी चिपळूण, संतोष परिशेटटे वनपाल गुहागर, अरविंद मांडवकर वनरक्षक गुहागर, अमोल लोडे, संजय भोसले, कासव मित्र तसेच ग्रामस्थ व पर्यटक यांच्या उपस्थितीखाली ६ कासव पिल्लांना सुरक्षितरित्या समुद्रीकिनारी सोडण्यात आले.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here