गुहागर-विजापूर रस्ता रुंदीकरण निकृष्ट ; पाटपन्हाळे-मोडकाघर दरम्यान, काँक्रीटचा रस्ता खचला

0
208
बातम्या शेअर करा

गुहागर– गुहागर-विजापूर रस्ता रुंदीकरणातील निकृष्ट कामांची मालिकाच सुरु आहे. पाटपन्हाळे येथे काँक्रीटचा रस्ता खचला असून येथील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. त्यातच मातीचा भराव रस्त्यावरच आणून टाकल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.

रस्ता रुंदीकरणात निकृष्ट कामांचे अनेक नमुने पहायला मिळत आहेत. कधी गटारे ढासळत आहेत. काँक्रीट रस्त्याला तडे जात आहेत तर संरक्षक भिंतीही ढासळत आहेत. पाटपन्हाळे बसथांब्याजवळ आज सकाळी अचानक रस्ता मधोमध खचला आहे. तसेच दुसऱ्या बाजूला रस्त्यावरच मातीचा भराव टाकण्यात आलेला आहे. सध्या रस्त्याच्या साईडपट्ट्या भरण्याचे काम सुरु आहे. यासाठी हा मातीचा भराव टाकलेला आहे मात्र, नेमका त्याच ठिकाणी रस्ता खचल्याने वाहतुकीला मोठा अडथळा येत आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here