चिपळूण ; दोन सांबरांची शिंगे घेऊन आलेले दोघे एलसीबीच्या जाळ्यात

0
100
बातम्या शेअर करा

चिपळूण – चिपळूण शहरानजिक सवतसडा येथे २ सांबरांची शिंगे विक्रीसाठी आणणाऱ्या दोन संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेने आणि चिपळूण पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले.

त्यांच्याकडून गाडी आणि इतर मुद्देमाल असा एकूण २ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.स्थानिक गुन्हे शाखेला शनिवार ३ डिसेंबर रोजी काही संशयित वन्यजीव प्राण्यांचे अवयव विक्रीसाठी चिपळूणला घेऊन येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेने चिपळूण पोलिसांच्या मदतीने सवतसडा नजीक मुंबई-गोवा महामार्गवर सापळा रचला. काही वाहनांची कसून तपासणी केल्यानंतर एका परजिल्ह्यातील वाहनामध्ये २ सांबरांची भरीव शिंगे मिळून आली. संशयितांवर वन्य जीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे कलम ३९,४४, ४८ व ५१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार शहा, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बोरकर, पोलीस हवालदार भागणे, झोरे, डोमणे, पालकर, पोलीस नाईक कांबळे, चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पाटील व चिपळूण तपासणी नाका येथील वनरक्षक कृष्णा इरमाले यांनी केली.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here