मुंबई -अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटकेंचा विजय झाला आहे. आता केवळ विजयी उमेदवाराची औपचारिक घोषणा बाकी आहे.
ऋतुजा लटके यांनी विजयानंतर आज अधिकृतपणे पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांचे विशेषत: ठाकरे गटाचे आभार मानले आहे. तसेच हा विजय माझा नाही तर माझे पती रमेश लटके यांचा असल्याची पहिली प्रतिक्रिया ऋतुजा लटके यांनी दिली आहे.यावेळी ऋतुजा लटके यांनी जनतेसह, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते अनिल परब यांचे आभार मानले. ऋतुजा लटके पुढे म्हणाल्या की, मी महाविकास आघाडीची उमेदवार आहे. त्यामुळे मी मातोश्रीवर जाणारच आहे. पण मविआच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचे मी आभार मानते.