गुहागर ; पाटपन्हाळे महाविदयालयाची मालाणी उदयोग समुहाला भेट

0
214
बातम्या शेअर करा

गुहागर – गुहागर तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असणा-या पाटपन्हाळे कला वाणिज्य आणि शास्त्र महाविदयालयातील प्रथम वर्ष वाणिज्य ( FY B.Com ) वर्गातील विदयार्थ्यानी शृगांरतळी येथे असणा-या रत्नागिरी जिल्हयातील प्रसिद्ध अशा मालाणी उदयोग समुहाला नुकतीच भेट दिली. या भेटीवेळी मालाणी उद्योगसमुहाचे सर्वेसर्वा नासिम मालाणी व युवा उदयोजक नदीम मालाणी व त्यांचा सर्व स्टाफ उपस्थित होता.

या भेटीवेळी सर्वप्रथम नदीम मालाणी यांनी सर्व विदयार्थ्याना त्यांच्या व्यवसायाची थोडक्यात माहिती दिली. प्रामुख्याने व्यवसायातील विविध प्रकारच्या वस्तुबदल माहिती देवून वस्तुचा साठा कसा केला जातो व तो साठा टिकविण्यासाठी कशा प्रकारे विविध तंत्राचा वापर केला जाती है सांगितले. व्यवसायामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर कशा प्रकारे केला जातो हे स्पष्ट करून पॅकिंग करणा-या यंत्राची माहिती देवून विदयार्थ्यांना प्रात्यक्षिक दाखविले. तसेच व्यवसायातील असणारे शितगृह विदयार्थ्याना दाखवून त्याची सविस्तर माहिती दिली. मालाणी उदयोगसमुहात जवळपास १०००० पेक्षा जास्त वस्तु असुन त्यातील मुख्य वस्तु कोठुन खरेदी केल्या जातात व कशाप्रकारे त्या आणल्या जातात याची माहिती त्यांनी विद्यार्थ्या दिली. विविध प्रकारे खरेदी करताना गुणवता कशी राखली जाते हे स्पष्ट करून ग्राहकाला कशा प्रकारे महत्व दिले जाते व शासकीय नियमांचे पालन कसे केले जाते हे सांगितले. सर्व व्यवसाय पाहिल्यानंतर नासिम मालाणी यांनी विदयार्थ्याना मार्गदर्शन करताना व्यवसायाची पुर्नबांधणी करताना कोणकोणत्या अडचणी आल्या व त्यावर कशा प्रकारे मात केली हे सांगुन धाडस करून नदिम मालाणी यांनी व्यवसाय कशा प्रकारे पुढे नेला हे स्पष्ट केले. व्यवसायाची प्रगती करताना आपल्या व्यवसायातील मनुष्यबळ कसे महत्वाचे आहे हे सांगुन आपल्या व्यवसायाला लाभलेल्या विविध कर्मचा-यांचा नामोल्लेख करून त्यांचे कौतुक केले. तसेच विदयार्थ्यांनी देखील विविध क्षेत्रात प्रगती करताना आत्मविश्वास ठेवून प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास चांगले यश मिळू शकते हे स्पष्ट केले… बदलत्या काळाला सामोरे जाताना आपणदेखील नवनवीन गोष्टी कशाप्रकारे शिकतो हे त्यांची विविध उदाहरणाच्याव्दारे स्पष्ट केले. नदिम मालाणी यांनी आपल्या मार्गदर्शनात विदयार्थ्यांनी कोणत्याही प्रकारे आपल्या शिक्षणात खंड पडू न देता जास्तीत जास्त शिक्षण घ्यावे व त्याचा उपयोग आपल्या सुयोग्य अशा भविष्यासाठी करावा असे आवाहन केले. या भेटीवेळी महाविदयालयाचे वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. सुभाष खोत तसेच नंदु भेकरे उपस्थित होते.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here