कोकण रेल्वे मार्गात कोसळली दरड

0
264
बातम्या शेअर करा

चिपळूण – कोकण रेल्वे मार्गावर लांजा येथील विलवडे येथे रेल्वे ट्रॅकवर दरड कोसळली. त्यामुळे रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती.

गेले दोन दिवस कोकणात मुसळधार पाऊस पडतोय. त्यामुळे संपूर्ण दळणवळण विस्कळीत झाले आहे. त्यातच आज लांजा तालुक्यातील आडवली रेल्वे स्थानकाजवळ ट्रॅकवरच दरड कोसळल्याने रेल्वे वाहतूक खोळंबली. ही दरड बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून प्रयत्न सुरु होते. मात्र अन्य गाड्या नाजिकच्या स्थानकावर थांबवून ठेवल्याने त्याचा परिणाम एकूणच रेल्वे वाहतूकीवर झाला असून गाड्या विलंबाने धावत आहेत.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here