बातम्या शेअर करा


गुहागर – गुहागर तालुक्यातील झोंबडी येथे विनापरवानगी सुरू असलेल्या नांगरणी स्पर्धा या गुहागर पोलिसांनी बंद पाडल्या. यावेळी समीर तावडे याला ताब्यात घेण्यात आली असून भारतीय दंड सहिता १८६०चे कलम १८८ प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ११(१) (क) अन्वये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.


कोकणात एकत्र पद्धतीने शेती केली जावी व तरुणांना शेतीचे आकर्षण व्हावे या उद्देशाने ही नांगरणी स्पर्धा आयोजित केली जाते. या स्पर्धेत तालुक्यातील अनेक गावातील अनेक शेतकरी आपल्या बैलजोडीसह उपस्थित असतात. या वेळेला नांगरणीसह शेतीचाही अनुभवही घेता येतो. मात्र हे सर्व करत असताना या स्पर्धा घेण्यासाठी शासनाच्या नियमावलीनुसार परवानगी घेणे आवश्यक असते. मात्र ती परवानगी न घेताच तालुक्यातील झोंबडी येते समीर तावडे यांनी ही स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेदरम्यान चिपळूण तालुक्यातील एका गावातील एका बैल जोडीला या स्पर्धेत जाणून-बुजून न उतरून दिल्याने त्या शेतकऱ्याने अखेर ११२ या नंबरला कॉल करून या ठिकाणी विनापरवानगी नांगरणी स्पर्धा सुरू आहेत. याबाबत पोलीस स्टेशनला माहिती दिली. त्यानंतर स्पर्धेच्या ठिकाणी गुहागरचे पोलीस दाखल झाले आणि त्यांनी याबाबत संपूर्ण माहिती घेऊन या स्पर्धा आयोजकांना थांबवण्यास सांगितले. काही काळ या ठिकाणी गोंधळ निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी दाखवलेल्या सामजस्यपणामुळे शेतकरी पुन्हा आपल्या घरी गेले. मात्र असं असलं तरी या ठिकाणी जी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती ती विनापरवानगी असल्याने आयोजक समीर तावडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती गुहागर पोलीसांकडून देण्यात आली.

याआधी मे मध्ये समीर तावडे यांनी याच गावातील एका मैदानावर विनापरवानगी बैलगाडी शर्यत आयोजित केली होती. त्यावेळीही पोलिसांनी तात्काळ त्याची दखल घेत त्या बैलगाडी शर्यत उधळून लावल्या होत्या. प्रत्येक वेळेला कायद्याच्या आदेशाला केराची टोपली दाखवणाऱ्या या समीर तावडेवर कायमस्वरूपी कारवाई करावी जेणेकरून यापुढे तो कायद्याचा आदर राखेल अशी मागणी येथील ग्रामस्थ करत आहेत.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here