शिवसेना ; सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेमुळे उद्धव ठाकरेंसाठी मात्र आशेचा किरण

0
265
बातम्या शेअर करा

मुंबई – शिवसेना कोणाची या मुद्द्याच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणीत अंतिम निर्णय आलेला नाही न्यायालयाने पुढील सुनावणी सोमवारी सांगितले आहे.

एकनाथ शिंदे गटाच्या अस्तित्वावर असलेली अस्थिरतेची टांगती तलवार कायम आहे. दुसऱ्या बाजूला न्यायालयाने निवडणूक आयोगाला पक्षाच्या चिन्हाबाबत कोणताही निर्णय घेण्यास मज्जाव केला आहे. या प्रकरणासाठी स्वतंत्र घटना पिठाची नियुक्ती करायची का याबाबतही सोमवारी निर्णय घेतला जाईल असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयासमोर शिंदे गटाच्या वतीने हरीश साळवे उद्धव ठाकरे यांच्या वतीने कपिल सिब्बल तर निवडणूक आयोगाच्या वतीने अरविंद दातार या वकिलांनी आपली बाजू मांडली.’मूळ पक्षाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही ‘अशी अतिशय महत्त्वपूर्ण टिप्पणी न्यायालयाने केले आहे ही टिपणी उद्धव ठाकरे यांच्यासाठी फायद्याची तर शिंदे गटासाठी डोकेदुखी आहे न्यायालयाकडून कोणत्याच बाबतीत शिंदे गटाला दिलासा मिळालेला नाही त्यामुळे शिंदे गटाची तिहेरी कुंडी झाली आहे अंतिम निर्णय आलेला नसल्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार यांना इलाजाने करावा लागेल अन्यथा जनभावना शिंदे गटाविरोधात वाढत जाईल आता मंत्रिमंडळ विस्तार केला आणि भविष्यात न्यायालयाचा निकाल विरोधात गेला तर मोठी पंचायत होईल त्यामुळे इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था एकनाथ शिंदे यांची झाली आहे. मूळ पक्षाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असे न्यायालयाने म्हटले आहे हा मुद्दा प्रमाण मानून न्यायालयाने भविष्यातील निर्णय दिला तर शिवसेनेला आयोजक करण्याचा एकनाथ शिंदे यांचा डाव फसू शकतो तिसऱ्या बाजूला न्यायालयाने निवडणूक आयोगालाही कोणताही निर्णय घेण्यास मज्जाव केलेला आहे या तिन्ही बाबी एकनाथ शिंदे यांच्या चिंतेच्या आहेतउद्धव ठाकरे यांचा मूळ पक्ष शाबूत राहिला तर एकनाथ शिंदे यांच्या बंडांसमोर कायदेशीर पेज वाढतील आम्ही शिवसेनेतच आहोत हा शिंदे गटाचा दावा ठरेल.न्यायालयाची ही सुनावणी मात्र उद्धव ठाकरे यांच्यासाठी अशीच किरण ठरताना दिसत आहे. मूळ पक्ष म्हणून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे महत्त्व अबाधित राहू शकते,ही सर्वात मोठी शक्यता निर्माण झाली आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here