चिपळूण ; शिवसेनेच्या मेळाव्यात अनंत गीते, भास्कर जाधव आज एकाच व्यासपीठावर

0
432
बातम्या शेअर करा

चिपळूण – शिवसेनेचा संकट काळ सुरू असताना शिवसेना नेते अनंत गीते आता मैदानात उतरले आहेत. ते आज 11 जुलै रोजी चिपळूणमध्ये येत असून, सकाळी 11 वाजता बाळासाहेब माटे सभागृहात त्यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

आमदार भास्कर जाधव या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. शिवसेनेचे नवनियुक्त उपनेते आमदार राजन साळवी यांचा चिपळूण शिवसेनेतर्फे सत्कार करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे 40 आमदार आपल्याबरोबर घेत, सरळ भाजपची घरोबा केला. साहजिकच आतापर्यंतचे हे सर्वात मोठे बंड ठरले असून शिवसेनेच्या एकूण अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे, शिवसेनेने थेट पुन्हा एकदा सामान्य शिवसैनिकांना हाक मारली असुन, नव्याने पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे. त्या अनुषंगाने शिवसेनेचे मेळावे व बैठका सुरू झाले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गेली काही वर्ष राजकारणापासून अलिप्त असलेले अनंत गीते आता थेट मैदानात उतरले आहेत. माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी रायगड व रत्नागिरी या दोन जिल्ह्याची जबाबदारी पक्षप्रमुखांकडून मागून घेतले आहे. या मेळाव्याला आमदार भास्कर जाधव उपस्थित राहणार आहेत. जाधव व गीते गेल्या कित्येक वर्षानंतर एकाच व्यासपीठावर येत आहेत. या मेळाव्याच्या निमित्ताने चिपळूण शिवसेना जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here