महाड -पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर भोर ते महाड या मार्गावरील गावांतील जनजीवन सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने काही महत्वाचे निर्णय घेतले आहे.
या गावांतील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू आणि औैषधे आगाऊ स्वरुपात उपलब्ध करून दिले जाणार आहे. रायगड जिल्हा प्रशासनाने वरंधा घाट हा वाहतुकीसाठी बंद केला आहे.गेल्या महिन्यातच हा घाट वाहतुकीसाठी खुला केला गेला होता. या घाटात नुकतीच एक दरड कोसळली आहे. या पार्श्वभुमीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी या मार्गाची पाहणी केली आणि काही ग्रामस्थांशी चर्चा केली. या चर्चेत ग्रामस्थांनी केलेल्या मागणीचा विचार करत जिल्हा प्रशासनाने काही निर्णय घेतले. या भागात पुढील आठवड्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. घाट रस्त्यावर दरड कोसळून दळणवळण बंद पडते. यापार्श्वभुमीवर रस्त्यावरील दरड बाजूला काढण्यासाठी जेसीबी तैनात केला जाणार आहे.