चिपळूण ; दहा लाख खर्च करून असे केले गेले डांबरीकरण, पहा काय आहे अवस्था…

0
55
बातम्या शेअर करा

चिपळूण – चिपळूण तालुक्याला धान्य पुरवठा करणाऱ्या येथील शासकीय धान्य गोदाम परिसरातील डांबरीकरणाचे काम वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. तब्बल १० रुपये खर्चातून केलेले डांबरीकरण अवघ्या महिनाभरातच उघडल्याने कामाच्या दर्जाबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.

या परिसरात मालवाहतूक व अवजड वाहनांची नेहमीच संवर्धन असल्याने पावसाळ्यात आणखी खड्डे निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याबाबत माजी नगरसेवक इनायत मुकादम यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या निकृष्ट दर्जाच्या कामाविषयी तक्रार केली आहे. तसेच हे काम बोगस असल्याचा आरोप करत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.चिपळूण शहरातील उक्ताड येथे तालुक्याचे धान्य साठा व पुरवठा चे गोदाम असून या गोदामात मोठ्या प्रमाणात धान्याचा साठा व वाहतूक केली जाते. अनेक वर्षांपासून गोदामाचे आवार व परिसरात प्रचंड मोठे खड्डे पडलेले होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. आता सुमारे २५ वर्षानंतर या गोदामाच्या आवारात पक्क्या स्वरूपाचे डांबरीकरणाचे काम सार्वजनिक विभागामार्फत करण्यात आले आहे. परंतु मी डांबरीकरण काही दिवसातच उघडले आहे. त्याबाबत सामाजिक कार्यकर्ते व माजी नगरसेवक इनायत मुकादम यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहाय्यक कार्यकारी अभियंता यांच्याकडे लेखी तक्रार दिली आहे. याबाबत मुकादम यांनी म्हटले की, इतक्या वर्षानंतर प्रथम या आवाराचे डांबरीकरणाचे काम झाले, त्यामुळे या कामाविषयी फार समाधान वाटले होते. मात्र या डांबरीकरणाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली असता हे काम पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे व बोगस स्वरूपाचे झालेले आहे. या कामात फसवणूक करण्यात आलेले आहे, हे प्रथम दर्शनी स्पष्टपणे दिसून येत आहे.या आवारात केलेले डांबरीकरण पूर्णपणे उखडले गेले असून ठिकठिकाणी मोठमोठ्या स्वरूपाचे खड्डे पडलेले आहेत. काही ठिकाणचा भाग पूर्ण बसलेला आहे. या डांबरीकरणाच्या कामात वापरलेले डांबर व खडी तसेच तत्सम साहित्य अत्यंत दर्जाहीन स्वरूपाचे वापरण्यात आले आहे. सदरचे काम अंदाजपत्रकीय आराखड्यानुसार करण्यात आलेले नाही. तसेच लाखो रुपये खर्च करून केलेले काम पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे झाले असल्याने या कामात आर्थिक लाभाच्या उद्देशाने फसवणूक करण्यात आलेली आहे. आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी कामाची पडताळणी व सखोल चौकशी करून सदरच्या कामावर नियंत्रण व देखभाल करणारे अधिकारी व संबंधित ठेकेदार यांच्या विरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी कदम यांनी केली आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here