पालघर – कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सहाव्या महिला संमेलनाच्या यजमानपदाचा मान पालकर जिल्ह्याला मिळाला आहे. संमेलनाची जय्यत तयारी सुरू असून हे संमेलन 11 व 12 जून रोजी पालघर येथील सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाच्या प्रांगणात संपन्न होणार आहे.
या दोन दिवसीय संमेलनांमध्ये जिल्हावासीयांना भरगच्च कार्यक्रमाचा आस्वाद लुटता येणार आहे त्यामध्ये चर्चासत्र कवियत्री कट्टा स्थानिक लेखकांचे पुस्तक प्रकाशन परिसंवाद व इतर अनेक कार्यक्रमांबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल सुद्धा असणार आहे. एकंदरच पालघर जिल्ह्यातील साहित्य रसिकांना दोन दिवसीय मनमुराद आनंद लुटता येणार आहे.ज्येष्ठ साहित्यिका मोनिका गजेंद्रगडकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. साहित्य संमेलनाच्या उद्घाटक विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे उपस्थित राहणार आहे. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ अभिनेत्री मधुरा वेलणकर तसेच कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर सहभागी होणार असून या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्षपद महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे भूषवणार आहे.