गुहागर – गुहागर समुद्र किनाऱ्या वरील सुरू बनातील अनधिकृत स्टॉल बंदर विभागाने हटविल्यानंतर तेथील काही स्टॉल धारकांनी आपले बस्तान पोलीस परेड ग्राऊंड वर बसविले होते,या अनधिकृत स्टॉल मुळे येथील पोलीस परेड ग्राऊंडवर क्रीडा प्रेमींना खेळाचा आनंद घेता येत नव्हता,या संदर्भात क्रिडा प्रेमींनी तक्रारी दाखल केल्या होत्या,अखेर सदरचे स्टॉल हटविण्या संदर्भात गुहागर तहसील दार यांनी ८ जून ची अंतिम तारीख स्टॉल धारकांना दिली होती, स्टॉल मालक जर ऐकत नसतील तर पोलीस बंदोबस्तात स्टॉल हटविण्यात येतील अशा सूचनाही देण्यात आल्या होत्या.त्या सूचनांचे पालन करत अखेर काही स्टॉल धारकांनी स्वतःहून स्टॉल चे सामान काढून जागा खाली केली आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात बंदर विभागाने गुहागर समुद्र किनाऱ्यावरील सुरुबनातील तब्बल २२छोट्या मोठ्या भेळपुरी, चायनीज, नाश्ता, आईस्क्रीम या सर्व स्टॉल व्यावसायिकांवर कारवाई केली होती,या स्टॉल धारकांनी स्टॉल न काढल्याने अखेर जेसीबीच्या साहाय्याने सर्व दुकाने पाडण्यात आली, यामुळे जिल्ह्यातील मोठी कारवाई ठरली होती, गुहागर समुद्र किनारी येणाऱ्या पर्यटकांना भेळपुरी, चायनीज, नाश्ता, आईस्क्रीमची व्यवस्था हे सर्व स्टॉल धारक करत होते. परंतु काही राजकीय पदावर असणाऱ्या व्यक्तींनी स्टॉल चे हॉटेल मध्ये रूपांतर केले, कुणी आमचे काही करू शकत नाही अशा अविर्भावात काही स्टॉल धारक होते, परंतु बंदर विभागाने कुणालाही न जुमानता सर्व स्टॉल हटविले, त्यावेळी जिल्ह्यातील फार मोठी कारवाई ही होती, तेथून हटविल्यानंतर काही व्यावसायिकांनी आपले स्टॉल पोलीस परेड ग्राऊंडवर सुरू केले, स्टॉल लावता लावता त्यांनी शेड, निर्माण केल्या, परंतु या शेड तेथे खेळणाऱ्या खेळाडूंना अडचणीच्या ठरत होत्या, अखेर महसूल विभागाने सदरची दुकाने हटविण्या संदर्भात नोटीस तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या मार्फत स्टॉल धारकांना दिली, मे महिन्या पर्यंत दिलेल्या नोटीस ला या स्टॉल धारकांनी जुमानले नाही अखेर ८, जून अखेर ची तारीख देण्यात आली, तसेच दुकाने न हटविल्यास दिनांक ९, जून रोजी पोलीस बंदोबस्तात दुकाने हटविण्यात येतील असा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर स्वतः दुकानदारांनी दुकाने हटविण्यास सुरुवात केली. त्यामुळे गुहागर परेड ग्राऊंडनी मोकळा श्वास घेतला आहे
…..फिरत्या धंद्याला तरी परवानगी द्या… …रिया सावर्डेकर
पोलिस परेड ग्राउंडवर भेल पूरी, स्नॅक सेंटर चालविणाऱ्या रिया सावर्डेकर यांनी सांगितले की,गेली कित्येक वर्षे आम्ही गुहागर समुद्र किनारी भेल पुरी व स्नॅक सेंटर सुरू केला आहे, परंतु ६ महिन्यापूर्वी बंदर विभागाने दुकाने हटविल्या नंतर मी पोलीस परेड ग्राऊंडवर व्यवसाय सुरू केला, परंतु आज पुन्हा याठिकाणी असलेले व्यवसाय हटविण्या बाबत महसूल विभागाने नोटीस बजावली आहे त्यानुसार आम्ही दुकाने खाली करत आहोत, आम्हाला बेकारीचा सामना करावा लागत आहे, घरी १४वर्षाचा मतिमंद मुलगा आहे,९, व ५, वर्षाचे दोन मुले आहेत, आई वयोवृध्द आहे, पतीला मधूमेह आहे, घराचे हप्ते भरायचे आहेत, दोन वर्षे कोरोना मध्ये गेले, त्यानंतर सावरल्यानंतर वादळाने नुकसान केले, त्यानंतर बंदर विभागाने कारवाई केली,त्यातच खूप नुकसान झाले,गेली काही महिने पोलीस परेड ग्राऊंडवर व्यवसाय सुरू केला तर आता महसूल विभागाने हटविण्याची नोटीस दिली, घर संसार कसा चालवायचा हा प्रश्न निर्माण झाला आहे.आम्हाला फिरत्या धंद्याला तरी परवानगी द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.