बातम्या शेअर करा

गुहागर – गुहागर तालुक्यातील झोंबडी येथील मैदानावर आज बैलगाडी शर्यतीचे आयोजित करण्यात आला होते. मात्र बैलगाडी शर्यतीसाठी लागणारी शासनाचे नियम डावलून परवानगी न घेता ही बैलगाडी स्पर्धा भरवण्यात आली होती ही स्पर्धा झोंबडी येथे होत असल्याचे लक्षात येताच गुहागर पोलिसांनी त्या ठिकाणी जावून ही बैलगाडी स्पर्धा उधळून लावली आणि आयोजकांना ताब्यात घेतले. मात्र आता आयोजकांवर कोणता गुन्हा दाखल करणार ? याची माहिती देण्यास मात्र पोलिसांनी टाळाटाळ केली त्यामुळे शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवून अशाप्रकारे बैलगाडीची स्पर्धा आयोजन करणाऱ्या आयोजकांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी प्राणी विचार संघटनेकडून केली जात आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here