गुहागर – गुहागर तालुक्यातील तवसाळ बाबरवाडी येथील सार्वजनिक विहीरीत भक्ष्याचा पाठलाग करताना बिबट्याचा बछडा विहिरीत पडला मात्र वनविभागाने त्याला ग्रामस्थांच्या मदतीने पिंजऱ्याद्वारे त्या बछड्याची सुटका केली.
गुहागर तालुक्यातील तवसाळ बाबरवाडीतील सार्व जनिक विहीरीमध्ये रात्री हा बिबट्याचा बछडा पडला होता. आज सकाळी विहीरीच्या ढासळलेल्या भागात हा बछडा बसल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. त्यांनी ही माहिती वन विभागापर्यंत पोचवली. त्यानंतर गुहागरचे वनपाल संतोष परशेट्ये, खेडचे वनपाल सुरेश उपरे, वनरक्षक अरविंद मांडवकर, संजय दुंडगे, दत्ताराम सुर्वे पिंजरा घेवून घटनास्थळी पोचले. तेथील ग्रामस्थांच्या मदतीने या बछड्याला विहीरीतून बाहेर काढले या बछड्याचे वय सुमारे दिड वर्ष होते.