एसटी महामंडळाच्या ताफ्यात पहिली इलेक्ट्रीक बस ‘शिवाई’ दाखल

0
43
बातम्या शेअर करा

मुंबई – राज्याची लाइफलाइन म्हणून ओळख असलेले लाल परी आता नव्या रुपात प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यातील पहिली इलेक्ट्रीक बस ‘शिवाई’ प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे.

एसटी महामंडळाच्या स्थापना दिनाच्या दिवशी शिवाई बसचा लोकार्पण सोहळा पार पडलाशिवाई इलेक्ट्रिक बसची लांबी 12 मीटर आहे. आतील बाजूस 2 आणि बाहेरील बाजूस 1 असे कॅमेरा आहेत.या बससाठी 10 बॅटरी असून एकदा चार्ज केल्यावर 200 ते 250 किलोमीटर धावणार आहे.ध्वनी व प्रदुषणविरहीत तसेच वातानुकूलीत बस असणार असून प्रवाशांना गारेगार प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे.ही बस ताशी 80 किमी वेगाने धावणार आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here