गुहागर – रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण रचनेत बदल करण्यात आला असून का गुहागर तालुक्यात पाच जिल्हा परिषद गट आणि दहा पंचायत समिती गण राहणार आहेत. पूर्वी गुहागर तालुक्यात 4 जिल्हापरिषद गट व 8 पंचायत समिती गण होते.
आता गुहागर तालुक्यात जिल्हा परिषद गट असगोली तर या गटात अंजनवेल आणि असगोली असे दोन पंचायत समिती गण आहेत.यात अंजनवेल पंचायत समिती गणामध्ये साखरी त्रिशुळ, पालकोट त्रिशुळ, साखरी बुद्रुक, रानवी, अंजनवेल, वेलदूर आणि धोपावे या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. तर असगोली पंचायत समिती गणात पेवे, खामशेत, पालपेणे, आरे, वरवेली आणि असगोली या ग्रामपंचायतीचा समावेश आहे.
शृंगारतळी जिल्हा परिषद गट यात तळवली पंचायत समिती गण यात कारुळ, विसापूर, पांगारी तर्फे हवेली, परचुरी, वडद, तळवली, मुंढर, गिमवी, झोंबडी तर शृंगारतळी पंचायत समिती गण – निगुंडळ, चिखली, जानवळे, पाटपन्हाळे यांचा समावेश आहे.
कोंडकारुळ जिल्हा परिषद गटार मळण आणि कोंडकारुळ असे दोन पंचायत समिती गण आहेत. मळण पंचायत समिती गणात कौंढरकाळसूर, मढाळ, सुरळ, पांगारी तर्फे वेळंब, जामसुद व पोमेंडी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. तर कोंढकारुळ पंचायत समिती गणात पालशेत, अडूर आणि कोंडकारुळ या ग्रामपंचायतींचा समावेळ आहे.
वेळणेश्वर जिल्हा परिषद गट यात वेळणेश्वर आणि शिर या पंचायत समिती गणांचा समावेश आहे. यातील वेळणेश्वर गण- वेळणेश्वर, साखरी आगर, उमराठ, हेदवी आणि नरवण या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. तर शिर पंचायत समिती गणात कोतळूक, पाली, कुटगिरी, पाभरे, शिर, मासु, चिंद्रावळे आणि पिंपर या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
पडवे जिल्हा परिषद गट यात पडवे व पाचेरी सडा हे दोन पंचायत समिती गण आहेत. यात पडवे गणात आबलोली, जांभारी, कुडली, काताळे आणि पडवे ग्रामपंचायतींचा समावेश आहे. तर पाचेरी सडा गणात खोडदे, आवरे असोरे, शिवणे, काजुर्ली, कोसबीवाडी, भातगांव, गोळेवाडी, कोळवली, पाचेरी सडा, पाचेरी आगर व आंबेरे खुर्द ग्रामपंचायतींचा समावेश आहे.