खेड – मुंबई-गोवा महामार्गावरील खेड कशेडी घाटात टँकरला झाला अपघात यात एक जणांचा जागीच मृत्यू झाला.
कशेडी घाटात एका वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने एका केमिकलच्या टँकरला अपघात झाला या अपघातात एका जणांचा मृत्यू झाला असून चालक गंभीर जखमी आहे अपघाताची घटना खेड येथील मदत ग्रुपचे प्रसाद गांधी ,समीर मोरे ,दीपक मोरे ,आदींनी घटनास्थळी धाव घेतली यावेळी त्यांना स्थानिकांच्या मदतीने जखमींना बाहेर काढण्यात यश आले यावेळी स्थानिक नागरिक शुभम भोसले ,यश दरेकर ,बंटी दरेकर ,राजेश दरेकर ,आकाश दरेकर आदी उपस्थित होते. गेल्या दोन दिवसापासून या महामार्गावर अनेक अपघात होत आहेत. या अपघातातील टँकर हा गुजरात वरून आला होता आणि लोटे एमआयडीसी मधील कंपनीकडे जात असल्याचे प्रथम दर्शनी माहिती मिळाली.