बातम्या शेअर करा

चिपळूण – चिपळूण बाजारपेठेतील नाथ पै चौक येथे आयशरच्या जोरदार धडकेत गुहागर तालुक्यातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.महेश प्रभाकर गुरव असे मृत तरुणाचे नाव आहे. महेश हा गुहागर तालुक्यातील वेळंब येथील रहिवासी आहे.

महेश हा पहाटेच्या सुमारास गुहागरवरून चिपळूण रेल्वे स्थानकात आपल्या बहिणीला आणण्यासाठी निघाला होता. तो बाजारपेठेत येताच नाथ पै चौकात त्याला एका आयशर गाडीची जोरदार धडक बसली. त्यामध्ये महेश गंभीर जखमी झाला, त्याला तात्काळ येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता.

घटनेनंतर संबंधित आयशर चालक गाडीसह तेथून फरार झाला. यावेळी काहींनी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. परंतु तो हाती लागला नाही. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून संबंधित गाडीचा शोध पोलीस घेत आहे. संबंधित आयशर चालक हा रत्नागिरीहून मुंबईकडे आंब्याची वाहतूक करणारा होता असा अंदाज पाठलाग करणाऱ्यांकडून सांगण्यात आला आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here