चिपळूण (प्रतिनिधी) : सकाळ ग्रुपच्या वतीने आयडॉल ऑफ महराष्ट्र या अंतर्गत सहकार क्षेत्रात उल्लेखनीय योगदान म्हणून चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना प्रशांत यादव यांना वुमन इन्फल्यूएन्सर हा पुरस्कार बुधवार दि. ११ मे रोजी कोल्हापूर, हॉटेल सयाजी येथे मधुरा बाचल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील कर्तृत्ववान महिलांचा यावेळी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. वुमन इन्फल्यूएन्सर पुरस्कारासाठी निवड करताना काही निकष लावण्यात आले. कौटुंबिक जबाबदाऱ्या, व्यावसायिक आव्हाने अशा असंख्य अडथळ्यांवर मात करून महिलांनी सर्वच क्षेत्रात आपले कर्तव्य सिद्ध केले, अशा गुणवंत महिलांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहित केले आहे. अशा सर्वच कर्तृत्ववान स्त्रीशक्तीला मानाचा मुजरा, असे गौरोवोद्गार मधुरा रेसिपी चॅनलच्या मधुरा बाचल यांनी काढले. त्यावेळी कार्यक्रमाला प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी पवार, संपादक श्रीराम पवार, शेखर जोशी, निखिल पंडितराव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एश्वर्या बहिरे यांनी केले. तसेच कार्यक्रमाला चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण, संचालिका स्मिता चव्हाण, संचालक अशोक साबळे, राजेंद्र पटवर्धन, चिपळूण तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, स्वामिनी यादव, प्रमोद साळवी, प्रकाश साळवी, अनिल उपळेकर, सुरेश गुणे, डी.सी.देशपांडे, थोरात, मोहन पटवर्धन, निलेश लाड, पांडुरंग लवेकर, विजय पाटील, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे अधिकारी महेंद्र खेतले, प्रशांत वाजे, अविनाश गुडेकर, गणेश कदम, संदीप पाटील, महेंद्र शिंदे, संदीप घोले, समीर इंदुलकर, समीर चिले, सौरभ गुजर, प्रथमेश कोतवडेकर, नितीन दाते आदी उपस्थित होते.आयडॉल ऑफ महाराष्ट्र वुमन इन्फल्यूएन्सर पुरस्कार प्राप्त सौ. स्वप्ना यादव यांना यापुर्वी अनेक राज्य-आंतरराज्य स्तरावरील पुरस्कार मिळालेले आहेत. सौ. स्वप्ना यादव या चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून उल्लेखनीय कार्य करीत आहेत. राज्यभरात ५० शाखांतून त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली पतसंस्थेची यशस्वी घौडदौड सुरु आहे. याकामी त्यांचे वडील आणि संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण, आई स्मिता चव्हाण व पती प्रशांत यादव यांची खंबीर साथ लाभत आहे. पतसंस्थेचे सर्व संचालक, कर्मचारी, अल्पबचत प्रतिनिधी या सर्वांच्या सहकार्यामुळेच आपण या पुरस्काराचे मानकरी झाल्याचे सौ. स्वप्ना यादव यांनी पुरस्कार स्वीकारताना सांगितले. या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.