बातम्या शेअर करा

चिपळूण- आयसीआयसीआय बँकेतून बोलत असल्याचे सांगून क्रेडीट कार्डची लिमिट वाढवायची आहे अशी बतावणी करून डेबिट कार्ड व ओटीपी नंबरच्या आधारे चिपळुणातील एकाच्या बँक खात्यातून ऑनलाईनद्वारे १ लाख ६० हजार रुपयांची रक्कम लांबवली आहे.

ही घटना २ मे रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी राधिका शर्मा नावाच्या अनोळखी महीले विरोधात येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शमशुद्दीन इसाहक परकार (वय ५८, रा. गोवळकोट रोड) यांनी दिली असून या महिलेची फसवणूक झाली आहे. राधिका शर्माच्या अनोळखी महिलेने शमशुद्दीन परकार यांना फोन करून आयसीआयसीआय बँक बोरीवली येथून बोलत असल्याचे क्रेडीट कार्डची लिमिट वाढवण्यासाठी कॉल केला आहे. असे सांगून शमशुद्दीन परकार यांचा विश्वास संपादन केला आणि परकार यांच्याकडून डेबिट कार्ड व ओटीपी नंबर मागवून घेऊन ९५ हजार व ६५ हजार असे एकूण १ लाख ६० हजार रुपये ऑनलाईनद्वारे काढून फसवणूक केली आहे. अधिक तपास चिपळूण पोलीस करीत आहेत.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here