खेड – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोकण विभागीय सरचिटणीस वैभव खेडेकर यांना धमकीचा फोन आल्याची माहिती समोर आली आहे.
मशिदींवरील भोंगे उतरवण्याबाबत घेतलेल्या भूमिकेमुळेच हा धमकीचा फोन आल्याचा आरोप वैभव खेडेकर यांनी केला आहे.धमकी देणारा फोन हा परदेशातील क्रमांकावरून आल्याचं खेडेकर यांनी सांगितलं.याबाबत ते खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहेत. फोन करणाऱ्या व्यक्तीने आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप खेडेकर यांनी केला आहे. खेडेकर यांनी राज ठाकरे यांच्या आदेशानुसार कोकणात महाआरती आणि मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी आंदोलन केलं होतं. या आंदोलनामुळेच धमकी देणारा फोन आल्याच त्यांचे म्हणणे आहे.