- मुंबई – भारतीय हवामान खात्याच्या मुंबई विभागाने दिलेल्या माहितीनुसार उद्या दिनांक 3 आणि परवा दिनांक 4 मे रोजी विजांच्या कडकडाटासह व गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस राज्यातल्या काही भागांमध्ये होऊ शकतो.
- तसंच जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. या वाऱ्याचा वेग सुमारे 30 ते 40 किलोमीटर प्रति तास राहण्याची शक्यता आहे. हा पाऊस पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याच्या मुंबई विभागाकडून कळवण्यात आली आहे.