गुहागर – गुहागर शहरात गेली 4 ते 5 दिवस शहरातील प्रभाग क्रमांक 1 आणि 2 मध्ये येणारा पिण्याचे पाणी दूषित असून ग्रामस्थ त्रस्त आहेत या बाबत गुहागर नगरपंचायत दुर्लक्ष करत असल्याचा आरोप येथील नागरीक करत आहेत.
गेली चार दिवस या नगरपंचायतीचा अजब कारभार चालू असून. गुहागर मधील भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्ष संगम मोरे आणि स्वीकृत नगरसेवक संजय मालप यांनी याबाबत दखल घेतली आणि स्थानिक ग्रामस्थांना घेऊन त्यांनी आरे येथे असलेल्या विहिरीचे पाहणी केली त्यावेळी तेथील पाणी पिण्यायोग्य नाही.हे त्यांच्या निदर्शनास आणून दिले तसेच योग्य ते नियोजन करून नगरपंचायतीने पाणी पिण्या योग्य पुरवठा करावा. यासाठी मागणी केली. भारतीय जनता पार्टी विरोधी पक्ष नेता उमेश भोसले व आरोग्य स्वच्छता सभापती प्रसाद बोले तिथे उपस्थित होते त्यांच्याशी चर्चा करून योग्य ते नियोजन करण्यात यावे आणि स्वच्छ पाणी ग्रामस्थांना पिण्यायोग्य पुरवठा करावा अशी मागणी केली.
हे दूषित पाणी पिऊन कोणता आजार झाला तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.