चिपळूण – मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील अरुंद अवघड वळणावर दोन भरधाव कंटेनरची समोरासमोर धडक होऊन दोन्ही कंटेनर चालक जखमी झाला आहे.
परशुराम घाटातील अरुंद अवघड वळणावर दोन कंटेनरची समोरासमोर धडक होऊन मोठा अपघात घडला. या अपघातात दोन्ही कंटेनर चालक जखमी झाले आहेत. या दोन्ही कंटेनरनी रस्ताच अडवल्याने दोन्ही बाजूला वाहनांची मोठी रांग लागली होती. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. तर या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तर महामार्गाचे काम करीत असलेल्या कंपनीने पोकलेनच्या सहाय्याने कंटेनर बाजूला करण्यास सुरुवात केली. तसेच चिपळुणातील क्रेनदेखील घटनास्थळी पोहोचली आणि दोन्ही कंटेनर बाजूला करण्यात आले. मात्र, तोपर्यंत प्रवाशांचे मोठे हाल झाले. परशुराम घाटातील चौपदरीकरण कामामुळे पर्यायी मार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणात होतांना दिसत आहे.