चिपळूण – चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था ही एक महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था आहे . या संस्थेच्या रत्नागिरी जिल्हयासह रायगड , सातारा , सांगली व कोल्हापूर जिल्हयात एकूण ५० शाखा कार्यरत आहेत . या पन्नास शाखांमध्ये जवळपास २४५ हुन अधिक कर्मचारी व ६८ हुन अधिक अल्पबचत प्रतिनिधी , ४९ सराफ व ७५० समन्वयक कार्यरत असून अत्यंत सेवाभावी वृत्तीने काम करणारा कर्मचारी वर्ग म्हणून या संस्थेच्या कर्मचाऱ्यांचा नाव लौकिक आहे .
कर्मचाऱ्यांना प्रोत्साहीत करण्यासाठी संस्थेमार्फत चांगले वेतन दिले जात असतानाच त्यांच्या चांगल्या कामाचे कौतुक करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जात असताना त्यामध्ये सर्वोत्कृष्ठ काम करणारे तीन शाखाधिकारी , सर्वोत्कृष्ठ काम करणारे तीन वसुली कर्मचारी यांचा खास यथोचित सत्कार करणे , सर्व कर्मचाऱ्यांना चांगल्या कामाबाबत वर्षात एकुण चार पगार भेट म्हणुन देण्यात येत असतात . अशा पध्दतीने त्यांचे कौतुक करीत असतानाच आपल्याला सिध्द करण्यासाठी सांघीक पध्दतीने क्रिडा स्पर्धात सामिल होऊन यशस्वी होणे साठी कसोशीने प्रयत्न करुन यशस्वी होण्यासाठी जिद्द व चिकाटी निर्माण व्हावी यासाठी क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करत असते . दि . ३० एप्रिल व १ मे २०२२ या कालावधीत संस्थेच्या सात विभागाच्या शाखांतर्गत कर्मचाऱ्यांच्या आठ संघामध्ये क्रिकेट स्पर्धांचे तसेच कर्मचारी संघ विरुद्ध संचालक मंडळ संघ अशा लक्षवेधी सामन्याचे दि . ०१ मे २०२२ रोजी आयोजन करणेत आले आहे . या स्पर्धा क्रिकेट क्षेत्रातील क्रिडापटुना व क्रिकेटची आवड असणाऱ्या क्रिडा रसिकांना एक प्रकारचे आकर्षण असेल . या स्पर्धा चिपळूण नगरपालीकेच्या पवन तलावावरील स्टेडीअम वर ३० एप्रिल व १ मे रोजी संध्याकाळी ठीक ०५.०० वाजता सुरु होणार असुन रात्री १० वाजेपर्यंत चालणार आहेत . विजेत्या संघाला व उपविजेता संघाला आकर्षिक शिल्ड देण्यात येणार आहे . संस्थेच्या नाविन्यपूर्ण उपक्रमास क्रिडा रसिकांनी व संस्थेच्या चाहत्यांनी उपस्थित राहुन कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करावे असे आवाहन चिपळूण नागरी पतसंस्थेच्या व्यवस्थापनाने केले आहे .